
Not all of us can do great things, but we can do small things with great love.
- Mother Teresa

Associated with Paani Foundation as Jalmitra from last Three years
Working For Village Named Udachiwadi near Saswad , Purandar District, Pune
Water conservation work
Coordinating Activities for " Shramdaan"
Fund Raising Activities for Village water conservation work
Encouraging people to contribute by means of plays , acts etc.
School development Initiatives





Formerly Associated with Lok Biradari Project Hemalkasa , Gadchiroli
Book Donations for School
Science Experiment Kit Donation
Woolen Clothes Donation for Hemalkasa Aashram
Appreciation !!! - As received from Mr. N.Kumbharkar, Udachivadi Village- (Heading Water conservation work in Village)
आपल्या सर्वांना माहितच आहे, उदाची वाडीत जे जलसंधारणाचे काम झाले, त्यात *असंख्य जलमित्रांचा मोलाचा वाटा आहे* आणि प्रत्येक जलमित्राबद्दल आपण येथे लिहू शकत नाही, तरीही, ज्या जलमित्रांची *उल्लेखनीय मदत* झाली, त्यांच्याविषयी दर 8-10 दिवसातून जसे शक्य होईल तसे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी, *दीप्ती खोरगे* मॅडम विषय थोडक्यात...
जशा नंदिनी मॅडम आमच्या गावाच्या मदतीसाठी धावून आल्या, त्याच पद्धतीने दीप्ती मॅडम मदतीसाठी धावून आल्या. 2018 मध्ये, 1 मे ला मॅडम श्रमदानासाठी उदाचीवाडीला आलेल्या, परंतु आमचा त्यांच्याशी फार काही संपर्क नव्हता.
पण 2019 ची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आमची तयारी सुरू झालेती आणि बाळासाहेब शिंदे सर(पुणे जिल्हा समनवयक), पुण्यातील वृक्ष संवर्धन ग्रुप आणि त्याच दिवशी, दीप्ती मॅडम आणि सर गावाला भेट देण्यासाठी आलेले.
मॅडम आणि सर,आमच्याबरोबर मिटिंगसाठी जॉईन झाले. मिटिंग मध्ये स्पर्धे च्या तयारीचा आढावा घेतला गेला आणि त्यानंतर त्या पुण्याकडे रवाना झाल्या.
त्यानंतर मॅडम *शनिवारी किंवा रविवारी वाडीला येऊ लागल्या*. आमच्या कामात आम्हाला हातभार लावू लागल्या आणि *वाडीच आणि मॅडमच नात घट्ट झालं*.
पुढे स्पर्धा सुरू झाली. 29 एप्रिल ला, समर्थ ग्रूप, पुणे, गावाला श्रमदानासाठी येणार होता आणि त्यांनी गावच्या लोकांनचा विरंगुळा म्हणून लोककलेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. *मॅडम ने पण गावातील मुलांच सुंदर अस नाटक पाणी फाऊंडेशन च्या कामा संदर्भात बसवलं होत*.
या कार्यक्रमाच्या, *आठ दिवस अगोदर पासून*, सर आणि मॅडम, *पिंपरी चिंचवड ते उदाचीवाडी 80 km अंतर* कापून, रोज गावाला येत होत्या आणि मुलांचा नाटकाचा सराव करून घेत असत. *हा कार्यक्रम खूपच सुंदर झालेला*.
पुढे 1 मे ची तयारी सुरू झाली आणि यासाठी, मी मॅडमला आगोदरच सांगितले होते की, मॅडम तुम्ही तयारीसाठी वाडीतच मुक्कामी या. ठरल्या प्रमाणे मॅडम आल्या येताना त्यांनी काही आयकार्ड बनवून आणले होते.
ते आयकार्ड वानरसेना आणि तयारीसाठी पुण्यामधून आलेल्या जलमित्राना देण्यात आले. तसेच, *मॅडम ने ₹ 23,000/- रुपयांची आर्थिक मदत मशीन कामासाठी केली होती*. त्या व्यतिरिक्त, *तांदूळ, साखर ,डाळ अशा स्वरूपाची मदत केलेली*.
मी विचार करतो की, या मॅडम प्राध्यापक आणि सर कंपनीत चांगल्या पदावरती काम करत आहेत, मग या वाडीविषयी आपुलकी का? *80 km प्रवास करून या गावाला मदत करण्यासाठी, ,पुन्हा पुन्हा जाण्याचा खटाटोप का?* याच उत्तर काय?
माझ्या मनातील उत्तर आहे, *सुशिक्षित होणे जेवढे गरजेचे आहे ना,तेवढेच प्रथम माणूस बनने, हे त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे आहे*. आजकाल माणुसकी असलेला, माणूसच पाहायला मिळतच नाही. जो तो स्वतः भवती गोल गोल फिरतोय.
गावच्या लोकांच्यात जाऊन, कमी दिवसात, गावच होणे, गावच्या लोकांना आपलसं करण, ,त्यांना मदतीचा हात देणं आणि त्यांना कामासाठी जमेल त्या वेळेस मदत करणं, म्हणजे त्यांच्या पाठीशी कायम उभ राहाणं आणि साधं राहणं *म्हणजेच सुशिक्षित असणं*, अस मला वाटत.
वरील सर्व गुण दीप्ती मॅडमच्या मध्ये आहेत. आम्ही ते अनुभवले आहेत आणि *अजूनही अनुभवत आहे*.
आजही मॅडम चा आपुलकीने फोन असतो, दादा काय चाललंय? वानरसेना कशी आहे?
पाणी फाऊंडेशन मूळे, आम्हाला एक *आदर्श बहीण* मिळाली, जी वाडीतील वानरसेनेची कायम
आपुलकीने विचारपूस करत असते.
सर्व खरंच *पाणी फाउंडेशन* मुळे अश्या *सुसंकृत ,सुशिक्षित ,आदर्श मॅडमची* भेट घडून आली आणि कळत नकळत थोडा,फार आमच्या मध्यें बदल झाला. *मॅडम, तुमच्या या मदतीला उदाचीवाडी करांचा सलाम!*
तुम्ही पाहिलेलं वाडीबद्दलच स्वप्न,आपण सर्वजण मिळून पुर्ण करू आणि एक *आदर्श गाव* बनवण्याचा प्रयत्न नक्की करू या... धन्यवाद
Started KIDS readers Club to inculcate reading habit in Kids

"Children are made readers on the laps of their parents." — Emilie Buchwald

.jpg)


Readers Club
For Kids






.jpg)



.jpg)